श्रीमंगेशी येथील देवकार्याचा परिचय. भाग 1
![]() |
| Shri Mangeshi |
श्री मंगेशी येथे बाहेर गावाहून आलेल्या प्रत्येक महाजनाने प्रथम देवदर्शन घ्यावे.
याला धुळभेट घेणे असे देखील म्हणतात.
मंदिरात प्रवेश करताच श्री मंगेशी देवा समोर ताटात एक नारळ ठेवून साष्टांग दंडवत घालायचा.
यानंतर अनुक्रमे एक एक केळे घेवून चौकावर श्री देवशर्मा त्यांना ग्रामपुरूष देखील म्हणतात.
त्यांच्या पुढे व श्री मुळकेश्वरास केळे अर्पण करून साष्टांग दंडवत घालायचा.
बाहेरून देवाचरणी आल्यानंतर जमल्यास सर्व विकार सारून अत्यंत लितेने ईश्वरास स्वत:ला समर्पण करून घेणे हा या मागचा हेतू असावा.
नंतर श्री लक्ष्मीनारायण ,श्री सूर्यनारायण व श्री गरूड हे एके ठिकाणी व श्री विरभद्र व श्री सातेरी हे दुस-या ठिकाणी अशी मांडणी आहे.
त्यांचेकडे जाऊन नमस्कार करून पुन्हा श्री मुळकेश्वर देवालयाच्या चौकावर येवून नमस्कार करून एकदोन मिनटे बसतात व नंतर मुख्य मंदीरात येवून साष्टांग नमस्कार करून थोडावेळ बसतात.
प्रवासाचा थकवा अशा देवदर्शनाने कुठल्याकुठे पळून जातो.
धुळभेट देणारे भटजी ज्यांना पैरीकर म्हणतात ते तिर्थ व श्रींची विभुती देतात ते तिर्थ प्राशन करायचे व विभुती कपाळी लावायची.
श्रमपरिहार होऊन यजमान नव्या दमाने व उत्साही होतो.
धुळभेट घेणारा कौंडिण्य गोत्री असेल तर तीन केळी एक नारळ घ्यायचा श्री मंगेशीच्या दर्शनात एका ताटात नारळ व एक केळे ठेवून साष्टांग नमस्कार करायचा.
श्री देवशर्मा व श्रीमुळकेश्वराकडे प्रत्येकी एक केळे ठेवून नमस्कार करायचा.
श्री लक्ष्मीनारायण , श्री सुर्यनारायण श्री गरूड सांतेरी ,श्री विरभद्र यांचे दर्शन घेवून मनोभावे नमस्कार करायचा श्री मुळकेश्वराकडे नमस्कार करून चौकावर थोडे बसायचे.
तेथून थोड्या अंतरावर असलेल्या श्री शिवशर्मा म्हणजे कौंडिण्य पुरूषाच्या मंदिरात जावून तेथे एक केळे अर्पण करून साष्टांग नमस्कार करायचा.
थोडावेळ बसून श्री मंगेश देवाकडे येवून भटजींनी दिलेले तिर्थ घेवून दिलेला अंगारा भाळी लावला म्हणजे धुळभेट म्हणजे देवाचे प्रथम दर्शन झाले.
सोमसुत्री प्रदक्षिणा:
तिर्थकुंड न ओलांडता जी प्रदक्षिणा घालतात त्याला सोमसुत्री प्रदक्षिणा असे म्हणतात.
प्रथम नंदीपासून देवाच्या उजवीकडून तीर्थकुंडापर्यंत जायचे आणि तिथून मागे वळून पुन्हा फिरून नंदीकडे येवून देवाच्या डावीकडे तीर्थकुंडापर्यंत यायचे.
तिथून पुन्हा मागे फिरून नंदीकडे यायचे अशाप्रकारे सोमसुत्री प्रदक्षिणा घातली जाते.
II ओम् नम: शिवाय गंगाधराय श्री मांगिरिषाय नमोस्तुते II

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा