बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

Shantadurga Namasmaran: गोवा की आराध्य देवी: शांतादुर्गा नामस्मरण का रहस्य व लाभ

Shantadurga Namasmaran 


Shantadurga Namasmaran: A Divine Practice for Peace, Strength & Spiritual Growth

  • Shantadurga Namasmaran, Shantadurga Devi Mantra, Shantadurga Temple Goa, Namasmaran Benefits, Shantadurga Devi Story, Goa Devi Shantadurga, Spiritual Mantra for Peace, Powerful Devi Mantra, Hindu Goddess Shantadurga, Daily Namasmaran Practice

Shantadurga Devi, जिसे गोवा की “शांतिदायिनी” देवी कहा जाता है, करुणा, शांति और शक्ति की प्रतीक मानी जाती हैं। उनका नाम स्मरण करना—Shantadurga Namasmaran—एक ऐसी साधना है जो मन, शरीर और आत्मा को संतुलित करती है।

आज की भागदौड़ भरी जिंदगी में कई लोग मानसिक तनाव, चिंता और नकारात्मक विचारों से परेशान रहते हैं। ऐसे समय में शांतादुर्गा नामस्मरण एक सहज, अत्यंत प्रभावी और मन को तुरंत शांत करने वाली आध्यात्मिक प्रक्रिया है।


🌺 शांतादुर्गा देवी कौन हैं?

शांतादुर्गा देवी को “मध्यस्थ” (Mediator Goddess) भी कहा जाता है। पौराणिक कथा के अनुसार, जब भगवान शिव और विष्णु में युद्ध होने लगा, तब देवी पार्वती ने शांतादुर्गा रूप धारण कर दोनों के बीच मध्यस्थता कर शांति स्थापित की।

इसलिए उन्हें—
✔ शांति की देवी
✔ सौम्यता की देवी
✔ शक्ति और संतुलन की देवी
—के रूप में पूजा जाता है।


🕉 Shantadurga Namasmaran क्या है?

देवी के नाम या मंत्र का निरंतर और भक्तिभाव से जप करना ही नामस्मरण कहलाता है।
इसे किसी भी समय, किसी भी स्थान पर बैठकर, चलते-फिरते या मन ही मन किया जा सकता है।

सबसे लोकप्रिय नामस्मरण:
“ॐ श्री शांतादुर्गायै नमः”
या
“श्री देवी शांतादुर्गा महाराणी की जय”


🧘‍♀️ Shantadurga Namasmaran के फायदे

1. मन को तुरंत शांति देता है

नियमित नामस्मरण से विचारों का शोर कम होता है और मन स्थिर होता है।

2. नकारात्मक ऊर्जा दूर होती है

देवी को शक्ति का रूप माना जाता है, इसलिए यह साधना सुरक्षात्मक ऊर्जा पैदा करती है।

3. आत्मविश्वास और सकारात्मकता बढ़ती है

नामस्मरण आपके आभामंडल (Aura) को मजबूत करता है।

4. मानसिक तनाव और चिंता में कमी

अनुसंधान बताते हैं कि मंत्रजप से मस्तिष्क में अल्फ़ा वेव बढ़ती हैं, जिससे तनाव कम होता है।

5. आध्यात्मिक विकास

यह साधना मन को भीतर की ओर ले जाती है और ईश्वर-साक्षात्कार की भावना जगाती है।


🙏 Shantadurga Namasmaran कैसे करें? (Step-by-Step)

1. शांत स्थान चुनें

जहां कम शोर हो और आप मन से जुड़ सकें।

2. कुछ गहरी सांसें लें

शरीर को रिलैक्स करें और मन को स्थिर करें।

3. मंत्र का जप शुरू करें

आप नीचे दिए मंत्रों में से कोई चुन सकते हैं—

  • ॐ श्री शांतादुर्गायै नमः

  • ॐ देवी शांतादुर्गा नमः

  • जय शांतादुर्गा माता

4. 108 बार जप करें

रुद्राक्ष माला या चित्त के माध्यम से।
नियमितता सबसे महत्वपूर्ण है।

5. अंत में प्रणाम करें

देवी के चरणों में कृतज्ञता व्यक्त करें।


🌟 कब और कितनी देर करें?

  • सुबह ब्रह्म मुहूर्त में

  • शाम के शांत समय में

  • या दिन में किसी भी समय

10–15 मिनट भी पर्याप्त हैं, लेकिन मन चाहे तो अधिक करें।


🌿 Shantadurga Namasmaran अनुभव (Devotee Experiences)

कई भक्त बताते हैं कि—
✔ तनाव अचानक कम होता है
✔ कठिन परिस्थितियों में समाधान मिलता है
✔ घर में शांति बनी रहती है
✔ मन में स्थिरता और भरोसा आता है

देवी की ऊर्जा अत्यंत कोमल, शांतिदायक और सुरक्षात्मक मानी जाती है।


Frequently Asked Questions (FAQs)

1. क्या Shantadurga Namasmaran रोज करना चाहिए?

हाँ, रोज 10–15 मिनट भी जीवन में बड़ा बदलाव ला सकता है।

2. क्या यह मंत्र किसी विशेष समस्या के लिए है?

यह मन की शांति, तनाव कम करने और आत्मबल बढ़ाने के लिए प्रभावी है।

3. क्या माला ज़रूरी है?

नहीं, बिना माला के भी मन ही मन जाप कर सकते हैं।

4. क्या किसी विशेष नियम की आवश्यकता है?

सच्चे मन से किया गया जाप ही सबसे प्रभावी होता है — कठोर नियम आवश्यक नहीं।


🪔 निष्कर्ष

Shantadurga Namasmaran एक सरल लेकिन अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक साधना है।
यह आपके जीवन में—
✨ शांति
✨ शक्ति
✨ आत्मविश्वास
✨ संरक्षण
—सब कुछ लाती है।

यदि आप मानसिक तनाव, नकारात्मकता या जीवन में असंतुलन महसूस करते हैं, तो शांतादुर्गा नामस्मरण आपकी आध्यात्मिक यात्रा को नई दिशा दे सकता है।


बुधवार, ६ जानेवारी, २०२१

Mangeshi temple goa | श्री मंगेश महादेवाची आराधना अत्यंत स्वर्गीय आनंद अनुभवास येतो

Mangesh Mandir Goa | Are You Getting the Most Out of Your | Mangeshi temple goa |
श्री मंगेश महादेवाची आराधना अत्यंत स्वर्गीय आनंद अनुभवास येतो 


श्री मंगेश महादेवाची आराधना
श्री मंगेश महादेवाची आराधना
Mangeshi temple Goa, Mangeshi temple timings, Shri Mangesh Mahadev, Mangeshi temple history, Mangeshi temple architecture, Mangeshi temple Ponda Goa, Best temples to visit in Goa, Spiritual places in Goa, गोवा मंगेशी मंदिर, श्री मंगेश महादेव आराधना, Mangeshi mandir information, Goa pilgrimage places

Goa म्हणजे फक्त बीच, पार्टी आणि निसर्ग नव्हे—तर इथे अनेक प्राचीन आणि शक्तिपूर्ण देवस्थाने आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आणि भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र म्हणजे Mangeshi Temple. पोंडा तालुक्यात वसलेले हे देवस्थान भगवान श्री मंगेश महादेव यांना समर्पित आहे. येथे येणारा प्रत्येक भक्त अत्यंत शांतता, समाधान आणि स्वर्गीय आध्यात्मिक आनंद अनुभवतो.


श्री मंगेश देवस्थानाचा इतिहास

मंगेशी मंदिराचा इतिहास 450+ वर्षे जुना मानला जातो. मूळ मंदिर कुंडई येथे होते, पण पोर्तुगीज आक्रमणाच्या काळात मंदिराचे संरक्षण करण्यासाठी ते पोंडा येथे हलवले गेले.
त्रैमूर्तीतल्या शिवाचे रूप — मंगेश महादेव” अशी भक्तांमध्ये श्रद्धा आहे.

‘मांगिरीश’ किंवा ‘मंगेश’ हा शब्द संस्कृतातील ‘मंगिरी ईश’ म्हणजे पर्वतावर वास करणारा ईश्वर यावरून आलेला मानला जातो.


🛕 मंदिराची वास्तुकला – गोव्याच्या परंपरेचे प्रतीक

मंगेशी मंदिर हे गोमंतकीय वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरचे दीपस्तंभ (lamp tower) प्रत्येक सणात दिव्यांनी उजळून निघते.

मंदिरातील प्रमुख वैशिष्ट्ये:

  • सुंदर कोरीवकाम असलेले मुख्य गर्भगृह

  • प्राचीन नंदी मूर्ती

  • मनमोहक घंटामंडप

  • शांततेने भरलेले तलाव (कुंड)

येथील स्वच्छता, शांतता आणि आध्यात्मिक वातावरण मनाला मोहून टाकणारे आहे.


🙏 श्री मंगेश महादेवाची आराधना – भक्तांचा दिव्य अनुभव

भक्तांच्या मते, येथे दर्शन घेतल्यावर मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि अंतर्मनात दिव्य शांती अनुभवास येते.
‘त्र्यम्बकं यजामहे’ या मंत्राच्या स्पंदनांनी संपूर्ण जागा पवित्र भासते.

विशेषतः:

  • सोमवार आणि महा शिवरात्री

  • नवरात्र उत्सव

  • रामनवमी
    या दिवशी मंदिरात भारी गर्दी असते आणि वातावरण अत्यंत पावन असते.


📍 Location & How to Reach Mangeshi Temple

  • स्थान: पोंडा, गोवा (Panaji पासून सुमारे 22 किमी)

  • Nearest Airport: Mopa / Dabolim Airport

  • Nearest Railway Station: Madgaon / Karmali

बस, कॅब किंवा बाईक रेंटद्वारे सहज पोहोचता येते.


Mangeshi Temple Timings

  • सकाळ: 06:00 – 13:00

  • संध्याकाळ: 16:00 – 21:00

विशेष पूजा किंवा उत्सवाच्या काळात वेळेत किंचित बदल होऊ शकतो.


🌟 Nearby Attractions (पोंडा परिसरातील ठिकाणे)

  • Shantadurga Temple (2–3 किमी)

  • Ramnathi Temple

  • Spice Plantations

  • Old Goa Churches

हे सर्व ठिकाणे जवळ असल्यामुळे एक उत्तम Goa Spiritual Tour तयार होतो.


🧭 Best Time to Visit Mangeshi Temple

  • ऑक्टोबर ते मार्च – हवामान छान, गर्दी मध्यम

  • उत्सव काळ – मंदिर सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवता येतात


🍲 Nearby Food & Stay Options

मंदिर परिसरात शाकाहारी भोजन सहज उपलब्ध आहे.
Ponda आणि Panaji येथे बजेट ते प्रीमियम हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे मिळतात.


🙌 Conclusion – स्वर्गीय शांतता देणारे देवस्थान

Mangeshi Temple Goa हे आध्यात्मिकता, श्रद्धा आणि सांस्कृतिक वैभव यांचे सुंदर मिश्रण आहे. येथे घेतलेले दर्शन मनाला प्रसन्नतेचा अनुभव देते. त्यामुळे गोवा प्रवासात हे देवस्थान नक्कीच समाविष्ट करावे.


FAQs (SEO-Friendly)

1. Mangeshi Temple कशासाठी प्रसिद्ध आहे?

श्री मंगेश महादेवाचे प्राचीन देवस्थान, शांत वातावरण आणि विशेष पूजेसाठी प्रसिद्ध.

2. Mangeshi Temple मध्ये ड्रेस कोड आहे का?

होय, सभ्य व पारंपरिक पोशाखाला प्राधान्य दिले जाते.

3. मंदिरात फोटोग्राफी परवानगी आहे का?

गर्भगृहात फोटोग्राफी साधारणपणे परवानगी नसते.

4. Mangeshi Temple गोवा ट्रिपमध्ये का समाविष्ट करावे?

आध्यात्मिक ऊर्जा, प्राचीन इतिहास आणि सुंदर वास्तुकलेमुळे हे अवश्य पाहण्यासारखे ठिकाण आहे.



Mangeshi temple goaa

भाविकजन ,कुळावी , महाजन हे श्री मंगेशीचे अत्यंत परम श्रद्धेने पुजन करतात. 


श्री मंगेश महादेवाची कृपा सतत रहावी यासाठी हरप्रकारे यत्न  करतात.


विवाह झाल्यानंतर नवदांपत्य प्रथमच सर्व परिवारासह देवदर्शनास येतात.


नवीन नवरा नवरी स्नान करून श्री मंगेश देवालयाच्या समोरील तलावावर विधिपुर्वक मंत्रस्नान करतात. 


यानंतर श्री मंगेशीचे मनोभावे साग्रसंगीत दर्शन होते.


हे सर्व विधी तेथील घैसास गुरूजी नवदांपत्याकडून करून घेतात याला गांठवल असे म्हणतात. 


श्री मंगेशीस घुड भरणे,रूद्रावर्तन पंचामृतासह एकादष्णी ,अभिषेक नैवेद्य ,लघुरूद्र बेड्यांचा, महारूद्र शिंगांचा 


रंगपुजा,नंदादिप ,देवालयीतील तीनदारी दीप आराधना.


इतकेच नव्हेतर दीपस्तंभ सुशोभित करून दिवे लावले जातात. 


देवालयाच्या इमारतीवर पणत्यांची दिप आराधना होते. 


जेव्हा जेव्हा असे पणत्यांचे दिप प्रज्वलीत होतात तेव्हा ते दृश्य फार मनोहारी असते.


नभीच्या तारका जणू श्रीमंगेशीच्या चरणी समर्पित होण्यासाठी अवतरल्या सारखे वाटते. 


यानंतर पंचदेव नैवेद्य ,श्री सांतेरी व श्री निरंकारास नैवेद्य ,श्री काळभैरवास वड्यांची माळ स्वत: यजमान किंवा 

पुरोहितींकडून अर्पण करून नैेवेद्य दाखविला जातो.


श्री मंगेशीस सहस्र बेल ,लक्षबेल वाहून प्रसन्न करतात.


लक्ष बेल अर्पण करताना शेवटचे त्रिदल सुवर्णाचे अर्पण करतात. 


अन्नसंतर्पण हे कटाक्षाने देवालयाच्या अग्रशाळेतच करतात.


ब्राम्हण सवाष्ण भोजन ,मुळकेश्वर यांच्यासाठी एक गावड्यास भोजन देऊन दक्षिणा दिली जाते. 


असे श्रीमंगेशीस प्रिय होतील असे सर्व विधी परंपरेने अत्यंत श्रद्धेने केले जातात.


दर सोमवारी जो शिबीकोत्सव होतो यात सुंदर सुशोभीत केलेल्या पालखीत  श्री मंगेश महादेव स्वर्गीय अशा थाटात 

विराजमान असतात. 


ही सोमसुत्री प्रदक्षिणा असते.


ही प्रदक्षिणा घालत असताना पालखी सोळा ठिकाणी थांबते याला पेणे असे म्हणतात.


जेव्हा ही पालखी मंदिरातून निघते तेव्हा बरोबर देवस्थानचे वैदिक ब्राम्हण,त्यावेळी आलेले महाजन, वाद्ये ,वाजंत्री , 

सेवेकरी, किर्तन करणारे ,नृत्यगायन करणारे , गुढ्या, तोरणे ,अब्दागिरी,छत्रचामरे, सुर्यपान घेतलेले 

हिलामतदार,दिवट्या घेतलेले मशालजी,मंगलदिप घेतलेल्या भावीण , चांदीच्या नक्षीदार पात्रांमधे सुगंधीत गंध ,धुप 

घेवून भटजी उपस्थित असतात.


भक्तजन  श्री मंगेश महाराजांना चव-या, मोर्चेल घेवून मन भक्तीने ओथंबलेल्या स्थितीत वारा घालतात.


देवस्थानचे कमाविसदार हातात सुंदर नक्षीयुक्त सुवर्णाचा राजदंड घेवून पालखी सन्निध उभे असतात.


 प्रत्येक थांब्यानंतर म्हणज पेण्या नंतर कमाविसदारांनी नम: पार्वतीपते हरहर महादेव असा घोष केला पालखी पुढे 

जाते.


यावेळी ब्राम्हण वेदघोष,रूद्रसुक्त श्रीमंगेश अष्टक म्हटले जाते.

झुलवे गायले जातात.


असा सर्व सरंजामात सोमसुत्री प्रदक्षिणा घातली जाते.


अापल्याला अत्यंत स्वर्गीय आनंद अनुभवास येतो. 


अशा परम पवित्र स्थानी जावून हा नेत्रसुखद सोहळा पहावा या सारखे भाग्य नाही.  


कारूण्यसिंधू श्री मांगिरीषाय नमो नम:

Mangeshi temple goa

🌷🌷🙏🙏🙏🌷🌷

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

Shri Mangeshi Goa / श्रीमंगेशी येथील देवकार्याचा परिचय. भाग 1

 श्रीमंगेशी येथील देवकार्याचा परिचय.  भाग 1

श्रीमंगेशी येथील देवकार्याचा परिचय.  भाग 1
Shri Mangeshi


श्री मंगेशी येथे बाहेर गावाहून आलेल्या प्रत्येक महाजनाने प्रथम देवदर्शन घ्यावे. 


याला धुळभेट घेणे असे देखील म्हणतात.


मंदिरात प्रवेश करताच श्री मंगेशी देवा समोर ताटात एक नारळ ठेवून साष्टांग दंडवत घालायचा. 


यानंतर अनुक्रमे एक एक केळे घेवून चौकावर श्री देवशर्मा  त्यांना ग्रामपुरूष देखील म्हणतात.


त्यांच्या पुढे व श्री मुळकेश्वरास केळे अर्पण करून साष्टांग दंडवत घालायचा. 


बाहेरून देवाचरणी आल्यानंतर  जमल्यास सर्व विकार सारून अत्यंत लितेने ईश्वरास स्वत:ला समर्पण करून घेणे हा या मागचा हेतू असावा. 


नंतर श्री लक्ष्मीनारायण ,श्री सूर्यनारायण व श्री गरूड हे एके ठिकाणी व श्री विरभद्र व श्री सातेरी हे दुस-या ठिकाणी अशी मांडणी आहे. 


त्यांचेकडे जाऊन नमस्कार करून पुन्हा श्री मुळकेश्वर देवालयाच्या चौकावर येवून नमस्कार करून एकदोन मिनटे बसतात व नंतर मुख्य मंदीरात येवून साष्टांग नमस्कार करून थोडावेळ बसतात.


प्रवासाचा थकवा अशा देवदर्शनाने कुठल्याकुठे पळून जातो.


धुळभेट देणारे भटजी ज्यांना पैरीकर म्हणतात ते तिर्थ व श्रींची विभुती देतात ते तिर्थ प्राशन करायचे व विभुती कपाळी लावायची.


श्रमपरिहार होऊन यजमान  नव्या दमाने व उत्साही होतो. 


धुळभेट घेणारा कौंडिण्य गोत्री असेल तर तीन केळी एक नारळ घ्यायचा श्री मंगेशीच्या दर्शनात एका ताटात नारळ व एक केळे ठेवून साष्टांग नमस्कार करायचा. 


श्री देवशर्मा व श्रीमुळकेश्वराकडे प्रत्येकी एक केळे ठेवून नमस्कार करायचा.


श्री लक्ष्मीनारायण , श्री सुर्यनारायण श्री गरूड सांतेरी ,श्री विरभद्र यांचे दर्शन घेवून मनोभावे नमस्कार करायचा श्री मुळकेश्वराकडे नमस्कार करून  चौकावर थोडे बसायचे.


तेथून थोड्या अंतरावर असलेल्या श्री शिवशर्मा म्हणजे कौंडिण्य पुरूषाच्या मंदिरात जावून तेथे एक केळे अर्पण करून साष्टांग नमस्कार करायचा.


 थोडावेळ बसून श्री मंगेश देवाकडे येवून भटजींनी दिलेले तिर्थ घेवून दिलेला अंगारा भाळी लावला म्हणजे धुळभेट म्हणजे देवाचे प्रथम दर्शन झाले.


सोमसुत्री प्रदक्षिणा:

तिर्थकुंड न ओलांडता जी प्रदक्षिणा घालतात त्याला सोमसुत्री प्रदक्षिणा असे म्हणतात.


प्रथम नंदीपासून देवाच्या उजवीकडून तीर्थकुंडापर्यंत जायचे आणि तिथून मागे वळून पुन्हा फिरून नंदीकडे येवून देवाच्या डावीकडे तीर्थकुंडापर्यंत यायचे.


तिथून पुन्हा मागे फिरून नंदीकडे यायचे अशाप्रकारे सोमसुत्री प्रदक्षिणा घातली जाते.


II ओम् नम: शिवाय गंगाधराय श्री मांगिरिषाय नमोस्तुते II

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

Shri Mangeshi Daily Pujan / प्रियोळ येथील श्री मंगेशीचे रोजचे नित्य पुजन

 
Shri Mangeshi Daily Pujan
Shri Mangeshi

प्रियोळ येथील श्री मंगेशीचे रोजचे नित्य पुजन

सकाळी सर्वप्रथम जवळजवळ दिड तास चौघडा व इतरवाद्यांच्या मंगलमय ध्वनींची नौबत होते.

चौघडा नगारखान्याच्या उंच ठिकाणी वाजवला जातो व इतर वाद्ये हि श्री मुळकेश्वर देवालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि श्री कौंडिण्य पुरूष यांच्या मंदिराच्या प्रवेश द्वाराशी वाजविली जातात.

काकड आरती करून सुर्योदयापुर्वी देवावरील निर्माल्य विसर्जन करून मग प्रभात पुजा केली जाते. 

विशेष पुजा करणा-यांसाठी  सात वाजता हजर रहावे म्हणून देवालयाच्या चौकावरील मोठ्या घंटेने इशारत केली जाते. 

तेथील वैदिक ब्रम्हवृंद आठ वाजेपर्यंत आपले नैमित्तिक कार्य आटोपून मंदिरात उपस्थित रहातात. 

अकरा ते बारा वाजेपर्यंत पुन्हा चौघडा झडतो.दुपारची महाआरती देवकार्यासाठी झालेल्या गर्दीप्रमाणे नियोजन करून होते.

प्रत्येक नोकर वर्गास आपआपल्या जबाबदारीप्रमाणे आपले काम करण्यासाठी 

नगा-याच्या डंक्याने इशारत दिली जाते.

दुपाच्या महाआरती पुर्वी जर कोणास आवर्तनअभिषेक असे काही देवकार्य करायचे असेल तर ते केले जाते. 

उशीर झाला तर मात्र ही देवकार्य दुस-या दिवशी ठेवली जातात.

संध्याकाळी सहा वाजता पुन्हा चौघड्याची नौबत होऊन श्री मुळकेश्वर, श्री शिवशर्मा यांच्या देवालयात नौबत वाजविनारे वाजंत्री परत मुख्य मंदिरात येईपर्यंत श्री मंगेश देवालयात चौकावर डाव्या बाजूस नृत्यांगनांकडून नृत्यगान होते.

प्रदोषवेळी निर्माल्य विसर्जन झाल्सावर नित्यावर्तने होतात तद्नंतर संध्याकाळी नैवेद्य होवून प्रदोष पुजन अतिशय समरसतेने यथासांग पार पाडतात.रात्री आठ वाजता पुराणिकांना मंदिरात येण्यासाठी घंटानादाने इशारात दिली जाते आणि मग पुराणिक तन्म़यतेने पुराण कथन करतात.

पुराण संपले की पुन्हा ऩगा-याची इशारत दिली जाते व नित्य हरिकिर्तन करणारे हरिदास बुवा देवालयात हजर होवून सुंदर हरिकिर्तन करतात.



या नंतर रात्री 10.30 वाजता आरती होते. 

आरती झाल्यानंतर मंत्रपुष्प, वेदघोष होऊन देवकार्य करणारे यजमान ,सर्व जमलेले महाजन यांच्या समवेत अभिष्टचिंतनार्थ प्रार्थना केली जाते. 

वेगवेगळ्या पुजा जसे की, रंगपुजा , महारूद्र व इतर उत्सव याकार्यक्रमानिमित्त वैदिक ब्राम्हणांचा आशिर्वाद असा कार्यक्रम होवून ब्राम्हणास दक्षिणा दिली जाते. 

सर्व जमलेल्या भाविकांना नैवेद्य प्रसाद वाटला जातो. 

हे सर्व होईपर्यंत नृत्यांगना अतिशय सेवाभावाने ईश्वरास आपली नृत्य सेवा अर्पण करीत असतात.

त्यांना देखील प्रसाद देवुन दिवसभराचा पुजनक्रम संपतो.

श्री मंगेशीचा शिबीकेत्सव संपुर्ण वर्षातील प्रत्येक सोमवारी पार पडतो.

दर सोमवारी श्री मंगेश महादेव सुंदर सजविलेल्या पालखीत  विराजमान असतात.

Shri Mangeshi Daily Pujan
श्री मुळकेश्वर
मंदिर परिसरात सोमसुत्री प्रदक्षिणा होते.देवस्थानात मुक्कामी असल्या भाविकांना सोमवारी मंगेशीहून बाहेर गावी जाता येत नाही.

 जर जाणे झालेच तर न चुकता पालखीउत्सवा वेळेपर्यंत परत यायलाच पाहिजे. 

सोमवारी बाहेर जाणे अगदी अपरिहार्य असेल तर जातांना श्रीमंगेश देवाकडे प्रार्थना करून क्षमायाचना करून जावे अशी परंपरा आतापावेतो अविरत चालू आहे. 

अशा प्रकारे रोज प्रत्येक जण नित्यनियमाने ठरविलेली आपआपली कर्तव्ये न चुकता पार पाडतो. 

II ओम् नमस्ते श्री विश्वेश्वराय त्रिलोचनाय मांगिरीषाय नमोस्तुतेII



बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

Shri Mangesh Mahadev from Goa / गोव्यातील महादेव श्री मंगेश

Mahadev Shri Mangesh from Goa / गोव्यातील महादेव श्री मंगेश

Shri Mangesh
II श्री मंगेश महारूद्राय नम: II
Shri Mangesh Mahadev from Goa

Shri Mangesh Temple, Mangeshi Temple Goa, Mangesh Mahadev, Mangesh Devastan History, Mangirish Mahadev, Kushasthali Shivling, Priol Mangeshi Mandir, Mangesh Temple Story, श्री मंगेश इतिहास, Shri Mangesh Mahima, Atruja to Mangeshi migration, Gaud Saraswat Kuldevta

श्री मंगेश मंदिर: इतिहास, उत्पत्ती आणि महात्म्य

भारताच्या सांस्कृतिक परंपरेत शिवपूजेचे एक महत्त्वाचे स्थान आहे. अर्धनारीश्वररूपाने शिव-पार्वतीचे एकत्व प्रकट होते आणि शिव म्हणजे कल्याण, हे सर्वश्रुत आहे. काळाच्या ओघात भारतीय भूमीवर शिवपूजेचे विविध रूपे विकसित झाली आणि त्यातील एक पवित्र रूप म्हणजे श्री मंगेश किंवा मांगिरीष महादेव.


🔱 श्री मंगेश लिंगस्वरूपाची उत्पत्ती

असे मानले जाते की लिंगाचे तत्त्व कल्पनेतून उदयास आले. प्रकृती-पुरुष तत्त्वाच्या एकत्वाचे ते प्रतिनिधित्व करते.
सह्याद्रीखंडात श्री मंगेशाचे लिंग कुशस्थली येथील हिरवाईत सापडल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतो.

वत्सकौडिण्य गोत्रातील देवशर्मा आणि शिवशर्मा हे श्री मंगेशाचे अत्यंत भक्त होते. शिवशर्मास दृष्टांत झाला की, त्यांचे आराध्य दैवत त्या परिसरात स्वयंभू स्वरूपात विद्यमान आहे.


🐄 दिव्य घटना: गाय आणि शिवलिंगाचा अभिषेक

एक गुराखी आपल्या गुरांसह त्या प्रदेशात जात असे. त्याने पाहिले की रोज एक गाय एका शिवलिंगावर स्वतःहून दुग्धाभिषेक करत होती.
ही अद्भुत घटना त्याने मालकास सांगितली आणि हे ऐकून देवशर्मा व शिवशर्मा अतिशय आनंदित झाले.

प्रत्यक्ष त्या जागी गेले असता त्यांनी दिव्य शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यांचे आराध्य दैवत प्रत्यक्ष अवतीर्ण झाले अशी त्यांना पूर्ण खात्री पटली. तेव्हापासून त्या स्वयंभू लिंगाची पूजा सुरू झाली.


⏳ सासष्टी ते अत्रूज: स्थलांतराची कथा (इ.स. 1566)

इ.स. 1566 मध्ये ख्रिस्ती शासन व मंदिरांवरील वाढत्या संकटामुळे श्रीमंगेशसह इतर परिवार मूर्तींचे स्थलांतर सासष्टीहून अत्रूज येथे झाले.
ही घटना इतिहासातील अत्यंत महत्वाची कारण ती मूर्ती पुढे गतिमान होत वर्तमानातील प्रियोळ येथे पोचली आणि दिव्य परंपरा पुढे चालू राहिली.


🏛️ प्रियोळचे मंगेशी मंदिर: भव्य आणि मनोहारी

आजचे प्रियोळ (Priol) येथील श्री मंगेशी मंदिर अत्यंत आकर्षक, देखणे आणि भव्य आहे.
देश-विदेशातून लाखो भाविक येथे येतात आणि श्री मंगेश महादेवाचे दर्शन घेऊन समाधानी होतात.

या मंदिराच्या मागील बाजूस छोटी पण अत्यंत सुंदर मंदिरे आहेत —

  • श्री लक्ष्मीनारायण

  • श्री सूर्यनारायण

  • श्री मूलकेश्वर

  • श्री वीरभद्र

ही सर्व मंदिरे एकाच तत्त्वाचा संदेश देतात —
शिव आणि विष्णू हे भिन्न नसून एकच परब्रह्माचे रूप आहेत.


🔱 मूलकेश्वर आणि नाईकस्वामी यांचे योगदान

अनेकांच्या मते श्री मूलकेश्वर हेच कदाचित त्या काळातील गुरांचे रखवालदार असावेत ज्यांना दिव्य शिवलינג प्रथम दिसले.

इतिहासात नमूद आहे की नाथपंथातील महान संत नाईकस्वामी हेही अठराव्या शतकात मंगेशी येथे आले होते.
यातून या स्थळाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक दृढ होते.


📜 श्री मंगेश महात्म्य आणि भक्तीचा वारसा

"श्री मंगेश महात्म्य" ग्रंथात नमूद आहे की देवशर्मा व शिवशर्मा यांनी कुशस्थली येथे प्रथम दर्शन घेतलेल्या त्या स्वयंभू लिंगाजवळच पहिले शिवालय बांधले.
ही परंपरा पुढे वाढत जाऊन आजचे भव्य मंदिर उभे राहिले.

स्वामी विवेकानंदांसारखे महापुरुषही मंगेशी मंदिरात दर्शनासाठी येऊन गेले आहेत.
आजही असंख्य भक्त सांगतात की,
“श्री मंगेश महादेवाकडे मनापासून मागितलेली मनोकामना पूर्ण होते.”


✨ निष्कर्ष

श्री मंगेश महादेव हे केवळ एक मंदिर नाही तर विश्वास, भक्ती आणि सातत्याचा वारसा जपणारे दैवत आहे.
कुशस्थलीतील स्वयंभू लिंगापासून सुरू झालेली त्यांची कथा आजही लाखो भक्तांना दिव्यता अनुभवायला भाग पाडते.


❓ FAQs (SEO-Friendly)

1. श्री मंगेश मंदिर कुठे आहे?

हे मंदिर गोवा राज्यातील प्रियोळ (Priol) येथे स्थित आहे.

2. श्री मंगेश मंदिराचे पौराणिक महत्त्व काय आहे?

येथील शिवलिंग स्वयंभू मानले जाते आणि गायेद्वारे रोजच्या दुग्धाभिषेकाची अद्भुत कथा याच्याशी जोडलेली आहे.

3. मंगेशी मंदिराला कधी स्थलांतर करावे लागले?

इ.स. 1566 मध्ये ख्रिस्ती दडपशाहीमुळे मूर्तींचे स्थलांतर सासष्टीहून अत्रूज येथे झाले.

4. श्री मंगेश कोणत्या समुदायाचे कुलदैवत आहे?

हे स्मार्तपंथी गौड सारस्वत ब्राह्मणांचे अत्यंत प्रिय कुलदैवत आहे.

Shri Mangesh Mahadev from Goa


II श्री मंगेश महारूद्राय नम: II



रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

Shri Mahalaxmi in 2020 / समुद्रकन्या श्री महालक्ष्मीचे कोलवेहून बांदिवडे गोवा या गावी स्थलांतर:


गोमंतकातील बांदिवडे वासिनी श्री महालक्ष्मी

shri Mahalaxmi
shri Mahalaxmi


या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडांशुतेजस्विनी 

आरक्ता रूधिराम्बरा हरिसखी या श्रीमनोल्हादिनी I

या रत्नाकरमन्थनात्प्रकटिता विष्णोश्च या गेहिनी 

सा मा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती Il


समुद्रकन्या श्री महालक्ष्मीचे पृथ्वी तलावर जन कल्याणासाठीच विविधरूपाने आगमन 

वैकुंठासारखे परम पावन श्रीरंग धाम सोडून समस्त विश्वाचे हित चिंतून देवी श्री महालक्ष्मी या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाल्या. 

वेळोवेळी अनेकरुपे धारण केली व भक्तांचे असुर विनाश करून रक्षण केले, कल्याण केले. 

देवी श्री महालक्ष्मीच्या पृथ्वीवरील आगमनाच्या अनेक कथा आहेत.

तसेच अनेक सुप्रसिद्घ ठिकाणी श्रीदेवीची अतिशय सुंदर तीर्थ क्षेत्र देखील आहे.  

स्वर्गतुल्य रमणीय गोमंतकामधेही श्रीमहालक्ष्मी देवीचे वास्तव्य सासष्टीमधे कोलवे या गावी होते.  

कालगतीत आपआपसातल्या भांडणामुळे परकीय शक्ति पवित्र गोमंतक काबीज करण्यात यशस्वी झाली. 

अत्यंत हाल सुरू झाले. 

विटंबना सुरू झाली. 

shri Mahalaxmi
shri Mahalaxmi


दैवतांची एके ठिकाणाहून दुस-या सुरक्षित जागी स्थलांतर

तेव्हा गोमंतकातील अनेक दैवतांची एके ठिकाणाहून दुस-या सुरक्षित जागी स्थलांतरे झाली. 

तसेच देवी श्री महालक्ष्मीचेही कोलवेहून फोंडे तालुक्यातील बांदिवडे या गावी स्थलांतर झाले.

नि:सिम देवीचे परम भक्त सट्टो आणि फट्टो यांनी श्री महालक्ष्मी देवीच्या स्थलांतर कामी फार मोलाची कामगीरी केली.

त्यांचे भाग्य किती थोर की त्यांना श्रीदेवीची प्रत्यक्ष आसनस्थ मुर्ती  स्वत:च्या खांद्यावर घेवून जाण्याची संधी मिळाली.  

बांदिवडे हे देवीचे फार पुर्वीचे आद्यस्थान आहे. 

अगदी  कोलवे गावाहून स्थलांतर करण्यापुर्वी जवळ जवळ 150 वर्ष आधी श्री महालक्ष्मी देवीचे स्थान होते.  

असं बांदिवडयातील श्री नागेश मंदिरासमोरील भिंतीत असलेल्या शिलालेखावरून सिद्ध होते. 

तर पुन्हा याच ठिकाणी श्रीदेवी महालक्ष्मीची स्थापना केली गेली.  

श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर विलक्षण सुंदर 



अतिशय स्वर्गीय असा आनंदाचा, सुखाचा दैवी अनुभव याठिकाणी प्रत्ययास येतो. 

श्री देवीची मनोहर मुळ मुर्ती ही शालीग्राम शिळेतील आहे. 

तर कोलवेहून स्थलांतरीत केलेली श्री महालक्ष्मी देवीची सुंदर मुर्ती ही पंचधातुची आहे. 

देवीच्या जवळच श्री नारायण देवाची सुरेख पाषाण मुर्ती आहे. 

प्रत्येक वर्षी श्री राम नवमीस कोलवेहून आणलेल्या मूर्तीचा उत्सव साजरा केला जातो

आणि उंच अशा रंगीबेरंगी सुंदर पुष्पांनी नयनरम्य नक्शीने सजवलेल्या रथातून श्रींची मिरवणूक निघते. 

श्रीरामनवमीस होणारा हा उत्सव फार वैशिष्ठ्यपुर्ण मानला जातो. 

रामनवमीस संध्यासमयी हा रथ थोडावेळ ओढून तेथेच थांबवला जातो. 

व नंतर दुस-या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध दशमीला पंचधातुच्या मुर्तीसमवेत मुळची बांदिवड्याची शालीग्राम मुर्ती या रथात विराजमान होते. 

महारथाची भव्य मिरवणूक निघते

अतिशय उत्साहात श्रद्धेने श्री देवीचे कुळावी, महाजन व अनेक भक्त असंख्य संखेने या महोत्सवात सहभागी होतात .

अनेक उत्तम सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम याठिकाणी प्रस्तुत होतात. 

मुळ शालीग्राम मुर्तीचा उत्सव दरवर्षी महशिवरात्रीस साजरा केला जातो. 

हया उत्सवात म्हणजे माघ वद्य चतुर्दशीला शिबिकोत्सव होतो. 

सुंदर सजविलेल्या स्वर्ण शिबिकेत श्री देवी विराजमान असतात. 

हा शिबिकोत्सव झाला की लगेच श्री देवींची उत्सव मुर्ती खांद्यावरील रथात बसविली जाते. 

हा खांद्यावरील रथोत्सव फार सुंदर असतो रथाची सजावट चित्ताकर्षक असते.

हा नयनरम्य सोहळा पाहणे म्हणजे भाग्याचेच समजावे. 

या वेळीही विवीध धार्मिक विधि, सोहळे केले जातात हे झाले म्हणजे रथोत्सवाची सांगता होते.  

व महाशिवरात्रीच्या दूसरे दिवशी म्हणजे माघ वद्य अमावस्येला श्री महालक्ष्मी देवीचे संपूर्ण मंदिर बंद असते. 

नंतर फाल्गुन प्रतिपदेला मंदिर उघडले जाते.

श्री महालक्ष्मी देवालयात श्री नारायण देव, श्री रवळनाथ, श्री नारायण पुरूष, श्री बाळेश्वर तसेच नि:सिम भक्त श्री सट्टो, फट्टो असा परिवार आहे. 


पोर्तुगीज काळात गोमंतकातील  जनतेवर अनन्वित अत्याचार झाले. 

जुलमाने हिंदुंचे ख्रिस्तीकरण करणे,  हिंदु देवदेवतांची, मंदिरांची तोडफोेड करणे, मंदिराचे चर्चमधे रूपांतर करणे, हिंदुना बाटवणे या सारख्या अत्याचाराने गोमंतकीय अगदी गांजून गेले होते.  

परंतु  यावर मोठ्या धैर्याने मात करून महाजनांनी, कुळाव्यांनी तसेच स्थानिकांनी आप आपली कुलदैवते तसेच पालवी दैवते जिवापाड सांभाळली.

|| महालक्ष्मीश्च विद्महे विष्णु पत्नीश्च धिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ||

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

Shri Shantadurga devi / श्री शांतादुर्गादेवीच्या अवतारातील स्कंद पुराणात मंगिरीश हे नाव कसे पडले


श्री शांतादुर्गादेवीच्या अवतारातील स्कंद पुराणात मंगिरीश हे नाव कसे पडले

श्री शांतादुर्गादेवी कुलस्वामीनी

श्री शांतादुर्गा देवी अवताराची स्कंद पुराणातील सह्याद्रि खंडातील अशी एक आख्यायिका आहे की,  एकदा कैलास पर्वतावर जगतपिता श्री शंकर व माता पार्वती सहजच सारीपाट  खेळण्यासाठी बसले.  हास्यविनोदात खेळ चालला होता. इतक्यात तिथे ब्रम्हदेव पुत्र नारद मुनिंचे आगमन झाले.

भविष्यात सृष्टीत काही घडायचे असेल तर नारदमुनीं पूर्व सुचना म्हणुनच प्रकट होतात अशा अनेक गोष्टी पुराणात आहेत. असो अगदी असेच घडणार होते आणि म्हणुनच की काय गौरीहराच्या या सारीपाटाचा खेळ चालला असताना नारद मुनीं कैलासावर आले.  मग काय त्यांचे शिवपार्वतीच्या सारीपाट खेळाचे निरीक्षण सुरू झाले. काही कळ तर ते काढणारच होते. 

नारदमुनी म्हणाले, " महादेवा , तुम्ही सारीपाट तर खेळत आहात, पण या खेळात पैज लावल्याशिवाय काही मजा येत नाही. पैज लावून खेळा देवा . 

मग काहीतरी मौज येईल". झालं मग काय पार्वती देवीही ही तयार झाल्या.

Shantadurga devi
Shantadurga devi



पैजेवर शिवपार्वतीचा द्युत सुरू झाला. पार्वती मातेने भोळ्या सांबाचे  सहजपणे बघता बघता त्रिशुळ , डमरू, नंदी,  व्याघ्रासन ,असे सर्वकाही जिंकून घेतले.अगदी त्यांचे तपस्थान कैलासही जिंकून घेतला. निलकंठ पुर्णपणे

 हरले दिगंबर झाले.  हे पाहून नारदमुनी महादेवांना म्हणाले, "हे काय देवा , तुम्ही तर सर्वस्व हरले. अंबेने तुम्हास परास्त केले.  आता तुमचा विश्वात लौकीक तो काय राहीला?



असे सर्व घडामोडीचे काम करून नारदमुनींनी नारायण नारायण करीत तिथुन काढता पाय घेतला.

 नंतर हरलेल्या अवस्थेत झालेल्या गोष्टीचा महादेवांना पश्चाताप झाला.  ते कैलासासकट सर्वस्व हरून बसले होते. पैजेप्रमाणे त्यांना कैलास सोडणे भाग होते. मनस्ताप झाल्यामुळे मन:शांती साठी गौरीपतीस तप:साधनेची आवश्यकता होती. म्हणून  श्री शंकर कैलास सोडून निघाले. 

ठिकठिकाणी तप:साधना करीत करीत फिरत असता गोमंतक प्रांतात आले. हा सुंदर रमणीय परिसर त्यांना खुपच आवडला. याचठिकाणी त्यांनी वास्तव्य करायचे ठरविले. अघाशी नदिच्या रम्य किनारी कुशस्थली येथे तप:साधनेत कर्पुरगौर रममान झाले. याच वेळी त्यांचा परमभक्त लोमेश शर्मा या ब्राम्हणास महादेवांनी मगरीच्या तावडीतून सोडविले. 



शंकर भगवानांनी प्रत्यक्ष येऊन आपल्याला संकटमुक केले हे पाहुन लोमेश शर्मा अत्यंत भावविभोर  होवून श्री शंकराची स्तुती करू लागले , लोमेश शर्माच्या निरतिशय नि:सिम भक्तीने व आर्ततेने धावा केल्यामुळे श्री शंकर त्या ब्राम्हणावर प्रसन्न झाले व त्यास वर  मागण्यास सांगीतले. तेव्हा त्या प्रेमळ भक्ताने महादेवास कायमचे याच ठिकाणी रहावे व देवा तुमची नित्य सेवा भक्ती घडावी व ज्या मगरीने त्यास  पकडले होते तीलाही महदेवांनी मुक्त करावे असा वर मागीतला. सांब सदाशिवांनी प्रसन्न होवून त्याची इच्छा पुर्ण होईल असा वर दिला.

दरम्यान इकडे कैलास पर्वतावर आपले प्रिय नाथ नाहीत. ते खरोखरच आपल्याला येथे सोडून निघून गेले याची पार्वती देवींना प्रकर्षाने जाणीव झाली. सगळीकडे शोधुनही महादेव दिसेनात हे बघून जगत्जननी हिरमुसली व कैलास सोडून  महादेवांच्या प्राप्तीसाठी रानोमाळ हिंडू लागली . शोध करत असता पार्वती मातेचही  गोवे प्रांतात अागमन झाले. 



त्रिकालदर्शी श्री शंकरांना याची जाणीव झाली. त्यांच्या विरहात देवीची झालेली व्याकुळ अवस्था पाहून महादेवांना करूणा आली. आता फार अंत न पाहता पार्वतीस दर्शन द्यावे असे त्यांच्या मनी आले.  पण पुन्हा त्या हिमनग कन्येची परिक्षा घ्यावी असा खट्याळ विचार करून त्यांनी भयंकर अक्राळ विक्राळ व्याघ्राचे रूप धारण केले. व जेथे पार्वती माता होती तेथे येवून मोठ्याने डरकाळी फोडली. 



तो भयंकर वाघ पाहून ती शैलपुत्री खुप घाबरली व त्राही मां गीरीश अशी आर्त हाक मारली .हे पाहून त्रिपुरारि व्याघ्ररूप टाकून आपल्या मुळ रूपात प्रकट झाले. आपले आराध्य असे समोर आलेले पाहून हिमनंदीनी आनंदुन गेली हे पाहून महादेवही तिच्या भक्तीने प्रसन्न झाले व कधीही तिचा त्याग करणार नाही असे वचन दिले.श्री शंकरांनी लोमशर्मासही कुशस्थली सोडून जाणार नाही असा वर दिला होता. 


पार्वती देवीने आपणास जसे मांगीरिश अशी हाक मारताच आपण माझे वियोगाचे दुःख दुर केले तसेच जे कोणी भक्त मांगीरीश या नामाने तुमची आराधना करतील त्या भक्तांची दुःखे दुर करून त्यांची मनोकामना आपण पुर्ण करावी असा वर मागीतला . 



पार्वती देवींची ही इच्छा ऐकून महादेवही प्रसन्न झाले व तेथेच मांगीरिश या नावाने राहीले व माता पार्वतीही पतीदेवांच्या तप:साधनेत व्यत्यय नको म्हणून थोड्या दूर अंतरावर केळोशीस शांतादुर्गा नावाने कायमचे वास्तव्य करून राहीली. अशा प्रकारे पार्वती देवीे गोवे प्रांती श्री शांतादुर्गा नावे प्रसिद्ध झाली.  श्री शांतादुर्गा देवी गौड सारस्वतांच्या कौशीक गोत्री लोकांची कुलदेवता आहे.


रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

Shantadurga devi / श्रीहरी व श्री शंकर यांच्यात कसा वाद निर्माण झाला

 आदिशक्ती हिच श्री शांतादुर्गा



         आदिशक्तीने वेळोवेळी अनेक अवतार घेवून प्रचंड राक्षसांचा बिमोड केला त्यांचे हनन केले हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु प्रत्यक्ष श्रीहरी व श्री शंकर यांच्यात कसा समेट घडवून आणला याबद्दल जाणून घेवू. 

          अशी कथा आहे की, फार प्राचीन काळी श्री विष्णु व श्री शंकर यांच्यात कदाचित अहंभावाने वाद निर्माण झाला. म्हणता म्हणता हा वाद इतका विकोपाला गेला की युद्ध परिस्थिति निर्माण झाली. कोणीही माघार घेईना. दोघांनाही आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला . आपणच श्रेष्ठ आहोत असे दोघांनाही वाटू लागले. त्याचे पर्यवसान भयंकर युद्धात झाले. घनघोर युद्ध जुंपले . सगळीकडे हाहा:कार माजला. दोन्हीकडूनही अत्यंत घातक अस्र शस्रांचा मारा होऊ लागला. कोणी कोणास ऐकेना.



      हे युद्ध पाहून ब्रम्हदेव मात्र खुप चिंतेत पडले. तपःसाधना करून महत्प्रयासाने त्यांनी सृष्टी निर्माण केली. तिचा होत असलेला असा विनाश पाहून त्यांना फार फार वाईट वाटत  होते ,सहन होत नव्हते. युद्धात होणारा ध्वनी कल्लोळाने ते व्यथीत झाले. 

     काय आणि कसे करावे हे त्यांना समजेना. दोघांच्या क्रोधाला कसा आवर घालावा या विवंचनेत पडले. दोन्ही देवांनी शांत व्हावे असे त्यांना मनोमन वाटले आणि अशा स्थितीत असतांनाच त्यांना आदिशक्तीचे स्मरण झाले. अतिशय आर्ततेने ब्रम्हदेवांनी मनोभावे आदिशक्तीची विनवणी केली, त्यासरशी ब्रम्हदेवांच्या स्वयंतेजातून आदिशक्ती प्रकट झाली.



      हे ईश्वरी , या दोघा हरीहरांना कसलेही भान उरलेले नाही. अतिशय क्रोधित होवून हे अघोरी युद्ध करीत आहेत. तीनही लोकांमधे या युद्धाने त्राही त्राही केले आहे. हे देवी कृपावंत हो व हे भिषण युद्ध थांबव अन्यथा ह्या सृष्टीचा विनाश अटळ आहे. 

       ब्रम्हदेवांची ती गलीतगात्र झालेली अवस्था पाहून त्या तेजोनिधी  आदिमाया जगत्जननीने  त्यांना आश्वस्थ केले. निर्भय केले व स्वताः अतिक्रोधाने संतप्त झालेल्या श्रीहरी व श्री शंकर या दोघांमधे उभी राहीली. पळभर दोघेही थांबले आणि तेव्हाच मोठ्या चातुर्याने त्या आदिमायेने दोघांनाही समजाविले.

      त्यांच्या ठायी असलेल्या ज्या अनंत अगम्य शक्ती आहेत त्या सृष्टी कल्याणासाठी आहेत. आपण मुलतत्व आहात ,तेव्हा दोघांनीही आपला तुच्छ अहंकार सोडून शांत व्हावे व  जगतकल्याण करावे असे अत्यंत प्रेमाने समजावून सांगीतले. त्याबरोबर दोघांनाही आपली चुक कळली. परस्परांच्या आत्यंतिक द्वेषाने आपण काय करायला निघालो होतो याची त्यांना जाणीव झाली. तेव्हा दोन्ही देवांनी अनन्य भावे देवीस शरण येवून कृपाशिर्वाद संपादन केला. सृष्टीचा होणारा विनाश आदिमायेने प्रसंगावधान राखून थांबवला व मोठ्या खुबीने शांतता प्रस्थापित केली , म्हणून या तिच्या अत्यंत दिव्य, नितांत सुंदर , निर्मळ रूपास शांतादुर्गा हे नाव शोभले व पुढे याच नावाने ती प्रसिद्ध झाली .

SHRI SHANTADURGA VIDEO

         आदिशक्तीच्या अनेक अवतारांपैकी शांतादुर्गा हे स्वरूप दोन महान देवांमधे सख्य घडवून आणले म्हणून फार वैशिष्ठ्यपुर्ण आहे. अशी ही तेजस्वी,ओजस्वी ,परमदयाळू शांतादुर्गा आपल्या भक्तांनाही तत्परतेने संकटमुक्त करते. फक्त अत्यंत श्रध्देने हाक मारावी. सर्व विश्वाची आई , ती येतेचे धावून आपल्यासाठी.

shri shantadurga devi


शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

Temple in Goa / परकीयांच्या आक्रमणानंतर परचक्र काळात गोमंतकातील मंदिरे

परचक्र काळात गोमंतकातील मंदिरे.




तीर्थ रामकुंड कुडमलादिक तीर्थांची स्थापना केली, आणि अशा प्रकारे ती पवित्र स्थाने निर्माण करून या ठिकाणी परशुराम वास करून राहिला. 

पुढे काही दिवसांनी त्याने दिग्विजयार्थ एक यज्ञ करण्याचे ठरविले.

त्याच्या सिद्धिसाठी पुष्कळ विद्वान ब्राम्हणांची गरज असल्याने उत्तरेकडील त्रिहोत्र (तिरहुन), देशातून आपले आप्त भारद्वाज कौशिक, वत्स, कौडिण्य, कश्यप, वसिष्ठ, जमदग्नि, विश्वामित्र, गौतम आणि अत्रि अशा महान तपस्वी विद्वान सारस्वत ब्राम्हणाना दक्षिणेत गोमतकात आणून परशुरामाने आपले यज्ञाचे काम संपन्न करून घेतले .

गोमंतक पर्वतांच्या आसमंतातील अष्टग्रामांत अग्रहारे देऊन तेथे त्यांची स्थापना केली. 

मठग्राम, वरेण्य, कुडतरी, बाणावली, शंखावली, रायचूरी, लोटली आणि नागवे यांस अष्टग्राम म्हणतात. 

मुख्यत्वेकरून एव्हापासून दक्षिण प्रांती सारस्वत ब्राम्हणांचा प्रवेश समजण्यात येतो. 

त्या पूर्वी एका परशुरामावांचून दुसरे सारस्वत ब्राम्हण कोणी नव्हते. 

हा दिग्विजय यज्ञ गोमंतकामध्ये पेडणे प्रांताच्या हरमल गावी झाला असे परंपरागत आख्यायिकेवरून समजते.

परशुरामाने जे दहा सारस्वत बाम्हणऋषी आणले त्यांची सहासष्ट कुळे होती. 

त्या सहासष्ट कुळांतून कुशस्थळी आणि केळोशी या दोन क्षेत्रांत कौत्स, वत्स आणि कौडिण्य ह्या तीन गोत्रस्थ ब्राम्हणांची दहा-दहा कुळे स्थापिली. 

बाकी जी गोत्रे राहिली त्यातून मठग्राम, वरेण्य, लोटली आणि कुडतरी या चार ग्रामांत सहा-सहा कुळे चूडागणि (चोडण), महाक्षेत्रांत दहा कुळे आणि दीपवति (दिवाडी) व गोमंचलाच्या मध्यभागी बारा कुळे स्थापिली. 

याप्रमाणे सहासष्ट कुळांची स्थापना करून त्यातील मुख्य ब्राम्हणांस १६ गावांचा अधिकार दिला. 

हा अधिकार अजून पावेतो त्यांकडेच वंशपरेपरेने चालत असून नंतरच्या काळात जरी गोमंतकप्रांत फिरंगी, क्रिस्ती धर्मीय, पोर्तुगीज सरकारच्या स्वाधीन गेला, तरी ते त्या गावचा कर (फोर) सरकारास देवून त्या गावचे उत्पन्न आपआपल्यांत वाटून घेत असत.

जे सारस्वत ब्राम्हण नंतरच्या काळात फिरंगी पायांनी बलात्काराने बाटविले त्यांस देखील हा अधिकार आहे.

कालांतराने गोमंतक व आजुबाजूच्या प्रांतात निरनिराळ्या देशीराजांची राज्ये चालू लागली त्यात मौर्य, कदंब, चालुक्य, वंशाचे राजे, त्यानंतर विद्यानगरचे, बेदरचे बहामनी संज्ञक मुसलमान राजे, विजापुरचे मुसलमान राजे आणि त्यांचा मांडलिक, सौदेकर राजा, सावंतवाडीकर मराठे राजे हे अधिकारावर आले. 

या सर्व संस्थानिक राजवटीमध्ये त्या त्या राजांच्या कारकीर्दीत सारस्वत ब्राम्हणांच्या प्रभावी बौद्धिक सामथ्याचे सहकार्य त्यांना मिळत गेल्याने त्यांच्या राज्यांचा भरीवपणा वाढत गेला. 

अधिकारावर सारस्वतांच्याच नेमणुका होत गेल्याची माहिती गतेतिहासांतून वाचावयास मिळते म्हणून यांचाही लौकिक व विस्तार वाढत गेला. 

   नानाविध कारणामुळे उत्तरेकडील वसाहती सोडून दक्षिणेत काही सारस्वत बाम्हण कुटुंबे गोमंतक प्रांत व आसपासच्या भागांत वसाहती करून जी राहिली, त्यांचे सांस्कृतिक धर्म व राजकारण ही दोन्ही व्यवस्थित चालल्याने समाजशासनही उत्तम होऊ लागले. 

पण, ही परिस्थिती त्यांना फार काळ लाभली नाही.

परकीयांच्या आक्रमणानंतर गोमांतकातील देवालये

इसवी सन १३१३ मुसलमानांनी देवगिरीच्या यादव वंशाची समाप्ती केल्यावर ते मुसलमान गोमंतकांत येऊन बंड करू लागले. 

त्यांनी येथील पुष्कळ देवालये मोडून टाकली आणि राज्याधिकाऱ्यांस हाकलून आपण राज्य करू लागले. 

परंतु पुढे इ.स. १३६७ मध्ये विजयनगरचे राजे हरिहरराय यांचे पदरी असलेले मुख्यमंत्री माधव उर्फ माधवाचार्य यांनी पुष्कळ सैन्यानिशी गोमंतकात येऊन मुसलमानांस हाकलून दिले आणि मुसलमानांनी मोडलेली देवालये पुन्हा बांधली व त्या माधवचार्यानी श्रीसप्तकोटीश्वराची पुनःस्थापना केली. 

तरी पण, मुसलमानांनी आपले आक्रमण थांबविले नाही. माधवाचार्यांच्या स्वर्गवासानंतर हरिहररायाने नरहरी मंत्री यास प्रधान नेमून गोमंतकांत पाठविले. 

पुढे इ.स. १५१० साली फिरंगी लोकांनी समुद्रमार्गे येऊन अकस्मात गोमंतकावर घाला घातला आणि लढाई होता होता त्यांचा अधिकार पक्का झाला. 

पराकाष्ठेचा क्रूरपणा चालवून हिंदूंची घरे, गोत्रे आणि देवालये बाटविणे. 

तोंडात दांडगाई करून खुपसणे अशा कृत्यांचा सपाटा चालविला. 

हिंदूंनी प्रतिकारार्थ दंगे केले. परंतु शत्रु एकमताने वागणारे आणि हिंदु परस्परांमध्ये कलह करण्याच्या कामी अत्यंत प्रवीण यामुळे शत्रुच विजयी झाले. 

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

Portugal in Goa / भारतात छोटा पोर्तुगाल निर्माण करण्याची पोर्तुगीजांची महत्वाकांक्षा


 भारतात छोटा पोर्तुगाल निर्माण करण्याची पोर्तुगीजांची महत्वाकांक्षा

देवभूमी गोमंतकांतील देवस्थाने इतिहासप्रसिद्ध असली तरी त्यांच्या इतिहासाची उपलब्ध असलेली साधने अत्यल्प आहेत. 

कारण, त्या भूमीवर परशुरामाने सर्व तीर्थे आणून स्थापिली. 



ती तीर्थे वालुकेश्वर, वाळकेश्वर, बाणगंगा, सरस्वती, तिच्या दक्षिणभागी, कुशस्थली

निर्माण करण्याच्या आकांक्षेने प्रेरित झालेल्या पोर्तुगीजांनी इ.स. १५४०-१७४०

मध्ये त्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या गोमंतकाच्या भागातील हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले. 

त्याचाच भाग म्हणून अनेक अमूल्य ग्रंथांची व देवस्थानांच्या दप्तरांची होळी करण्यात आली. 

श्री मंगेश देवस्थानाच्या सोळाव्या शतकापर्यंतच्या इतिहासाचे पुराण हे एकमेव साधन आहे. 



पुढील दोन शतकांतील साधनांची व्याप्ती पेशव्यांची दानपत्रे व पोर्तुगीजांचे दप्तर एवढ्यापुरती मर्यादित आहे. 

सन १८१५ पासून देवस्थानचे दप्तर मात्र उपलब्ध आहे.


देवभूमी गोमंतकांतील प्रमुख देव आणि देवस्थाने यांचा प्राचीन काळी उगम केव्हा आणि कसा झाला. 


ते देव आणि त्यांची देवालये मूळ प्रथमत:च केव्हां, कोणी स्थापन केली, आणि ते देव व त्यांची देवालये यांचे आद्य संस्थापक कोण.



ही अत्यावश्यक माहिती प्राथमिक स्वरूपांत का होईना, तत्कालीन धार्मिक आणि राजकीय गतेतिहासाच्या आधारे समजून घेतल्याशिवाय मुख्य विषयाचे आकलन होणे जरा कठीण आहे.


 म्हणून ती माहिती आरंभीच अगदी संक्षिप्तांत घेण्याचा प्रयत्न करूं सह्याद्रिपासून समुद्रापर्यंत अरुंद अशी जी लांबच्या लांब कोकणपट्टी आहे. 


तिला परशुराम क्षेत्र असे नाव आहे. 


ह्या परशुरामक्षेत्रासंबंधी स्कंद पुराणांतील सह्याद्रिखंडात जी माहिती आहे.  


हे परशुरामक्षेत्र शूर्पाकार म्हणजे सुपासारखे असून वैतरणी नदीच्या दक्षिणभागी आणि सुब्रम्हण्याच्या पश्चिमेस आहे. 


शूर्पाकार म्हणण्याचा हेतू असा की, सह्याद्रिपासून 


समुद्रापर्यंत बारा कोस रुंद आणि चारशे कोस लांब, सुपाच्या आकाराप्रमाणे

भार्गवरामास भूमि मिळाली. 


आणि ती भूमि काशीक्षेत्रापेक्षा अधिक पवित्र झाली. 


कारण, त्या भूमीवर परशुरामाने सर्व तीर्थे आणून स्थापिली. 


ती तीर्ये ही : 'विमल, निर्मल स्वदिरतीर्थ, हरिहरेश्वर (बाणकोटाजवळ), मुक्तेश्वर,

वालुके वर, वाळकेश्वर, बाणगंगा, सरस्वती, तिच्या दक्षिणभागी, कुशस्थली

कुठ्ठाळ), मठग्राम (मडगांव).गोमांचल (गोमांतक).