Mahadev Shri Mangesh from Goa / गोव्यातील महादेव श्री मंगेश
shri mangeshi |
असे मानले जाते की उत्पत्ती कल्पनेतून लिंग चिन्हांचा उद्भव झाला .
त्या कल्पनेतूनच प्रकृतिपुरूष म्हणूनअर्धनारी नटेशवरात शिवपार्वतीरूप आपण पाहतो.
शिवपार्वती एकरूप सन्मिलीत असल्याने शिव म्हणजे कल्याणरूप हे सर्वश्रुत आहे.
पुढे त्याचे महत्त्व भारतापुरते मर्यादित राहून इतरत्र ते लुप्त व्हायला तिथला ख्रिस्ती व इस्लामी धर्माचा प्रसार कारणीभूत आहे.
श्रीसप्तकोटीश ,श्रीनागेश प्रमाणे श्रीमंगेश हे देखील महादेवाचे रूप आहे.
लिंग स्वरूपातील श्री शंकराची पुजा ही सर्वप्रचलीत आहे.
Shri Mangesh
सह्याद्रीखंडात मंगेशाचे लिंग हे कुशस्थलीतल्या सुंदर वनराईत सापडल्याचा उल्लेख आहे .
वत्स कौडिण्य गोत्र असलेले देवशर्मा व शिवशर्मा हे श्री मंगेशाचे परम भक्त होते. शिवशर्मास असा दृष्टांत झाला होता की,श्रीमंगेशाचे त्याच भागात वास्तव्य आहे.
एक गुराखी त्यांची गुरे चरावयास घेवून जात असे.
तेव्हा त्या गुराख्याने पाहिले कि, एक गाय रोज एका शिवलिंगावर रोज दुग्धधारांचा अभिषेक करीत असे.
ही गोष्ट त्याने आपल्या मालकास सांगितली.
हे ऐकून तो खुपच आनंदित झाला.
साहजिकच होते प्रत्यक्ष श्रीमंगेश महादेव दृष्तांताप्रमाणे अवतीर्ण झाले याची त्याला खात्री पटली.
देवशर्मास बरोबर घेवून त्याठिकाणी येवून त्या शिवलिंगाचे हर्षभरीत होवून दर्शन घेतले.
कारण त्याचे आराध्य दैवत प्रत्यक्ष प्रकटले होते.
दोघांनीही त्यावेळी महादेवाचे पुजन करण्यास सूरूवात केली.
बराच काळ लोटल्यावर यथावकाश इ.स.1566 मधे झालेल्या स्तलांतरावेळी श्रीमंगेश व इतर परिवारमुर्तींचे सासष्टी येथून अंत्रूज येथे आगमन झाले.
श्रीमंगेश हे स्मार्तपंथी गौड सारस्वतांचे अत्यंत प्रिय असे दैवत आहे.
प्रियोळ गावी ज्याला आपण मंगेशी म्हणून ओळखतो तेथे अतिशय सुंदर देखण्या मंदिरात मंगेश महादेव विराजमान आहेत.
अनेकांची ते आस्था आहेत.
श्री मंगेश मंदिराच्या पाठीमागे श्री लक्ष्मीनारायण,श्री सुर्यनारायण ,श्रीमुळकेश्वर व श्री विरभद्र यांंची फार सुंदर छोटी छोटी मंदिरे आहेत.
श्री विष्णु व श्री शंकर हे वेगळे नसून एकच आहेत हाच अर्थ यातून अभिप्रेत होतो.
श्री मुळकेश्वर हेच बहुधा शिवशर्माच्या देवशर्मा यांच्या गुरांचे राखणदार असावेत.
त्या दिव्य शिवलिंगाचे त्यास दर्शन झाले होते.
देवतास्वरूप मानव म्हणून देवशर्मा ,शिवशर्मा ,मुळकेश्वर व नाईकस्वामी यांना मानतात.
नाईकस्वामी हे नाथपंथातील महान सतपुरूष अठराव्या शतकात मंगेशीस येवून गेल्याची ऐतिहासिक नोंद आहे.
श्री मंगेश महात्म्यामधे देवशर्मा व शिवशर्मा यांनी हे दिव्य स्वयंभू शिवलिंग दिसले त्याचठिकाणी म्हणजे कुशस्थली येथे शिवालय बांधले असे म्हटले आहे.
Mulakeshwar |
देशी विदेशी पर्यटक श्रीमंगेशीचे रूप डोळेभरून मनात साठवून समाधान पावतात.
महादेवाचा अंश असलेले स्वामी विवेकानंद देखील याठिकाणी येवून गेले आहेत.
श्रीमंगेशीचरणी लिन होवून अगदी आस्थेने काही मागीतले तर भक्तवत्सल श्रीमंगेश महादेव त्यांची इच्छा पुर्ण करतात.
अनुभव आलेले असंख्य भाविक आहेत.
II श्री मंगेश महारूद्राय नम: II
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा