रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

Shri Mahalaxmi in 2020 / समुद्रकन्या श्री महालक्ष्मीचे कोलवेहून बांदिवडे गोवा या गावी स्थलांतर:


गोमंतकातील बांदिवडे वासिनी श्री महालक्ष्मी

shri Mahalaxmi
shri Mahalaxmi


या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडांशुतेजस्विनी 

आरक्ता रूधिराम्बरा हरिसखी या श्रीमनोल्हादिनी I

या रत्नाकरमन्थनात्प्रकटिता विष्णोश्च या गेहिनी 

सा मा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती Il


समुद्रकन्या श्री महालक्ष्मीचे पृथ्वी तलावर जन कल्याणासाठीच विविधरूपाने आगमन 

वैकुंठासारखे परम पावन श्रीरंग धाम सोडून समस्त विश्वाचे हित चिंतून देवी श्री महालक्ष्मी या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाल्या. 

वेळोवेळी अनेकरुपे धारण केली व भक्तांचे असुर विनाश करून रक्षण केले, कल्याण केले. 

देवी श्री महालक्ष्मीच्या पृथ्वीवरील आगमनाच्या अनेक कथा आहेत.

तसेच अनेक सुप्रसिद्घ ठिकाणी श्रीदेवीची अतिशय सुंदर तीर्थ क्षेत्र देखील आहे.  

स्वर्गतुल्य रमणीय गोमंतकामधेही श्रीमहालक्ष्मी देवीचे वास्तव्य सासष्टीमधे कोलवे या गावी होते.  

कालगतीत आपआपसातल्या भांडणामुळे परकीय शक्ति पवित्र गोमंतक काबीज करण्यात यशस्वी झाली. 

अत्यंत हाल सुरू झाले. 

विटंबना सुरू झाली. 

shri Mahalaxmi
shri Mahalaxmi


दैवतांची एके ठिकाणाहून दुस-या सुरक्षित जागी स्थलांतर

तेव्हा गोमंतकातील अनेक दैवतांची एके ठिकाणाहून दुस-या सुरक्षित जागी स्थलांतरे झाली. 

तसेच देवी श्री महालक्ष्मीचेही कोलवेहून फोंडे तालुक्यातील बांदिवडे या गावी स्थलांतर झाले.

नि:सिम देवीचे परम भक्त सट्टो आणि फट्टो यांनी श्री महालक्ष्मी देवीच्या स्थलांतर कामी फार मोलाची कामगीरी केली.

त्यांचे भाग्य किती थोर की त्यांना श्रीदेवीची प्रत्यक्ष आसनस्थ मुर्ती  स्वत:च्या खांद्यावर घेवून जाण्याची संधी मिळाली.  

बांदिवडे हे देवीचे फार पुर्वीचे आद्यस्थान आहे. 

अगदी  कोलवे गावाहून स्थलांतर करण्यापुर्वी जवळ जवळ 150 वर्ष आधी श्री महालक्ष्मी देवीचे स्थान होते.  

असं बांदिवडयातील श्री नागेश मंदिरासमोरील भिंतीत असलेल्या शिलालेखावरून सिद्ध होते. 

तर पुन्हा याच ठिकाणी श्रीदेवी महालक्ष्मीची स्थापना केली गेली.  

श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर विलक्षण सुंदर 



अतिशय स्वर्गीय असा आनंदाचा, सुखाचा दैवी अनुभव याठिकाणी प्रत्ययास येतो. 

श्री देवीची मनोहर मुळ मुर्ती ही शालीग्राम शिळेतील आहे. 

तर कोलवेहून स्थलांतरीत केलेली श्री महालक्ष्मी देवीची सुंदर मुर्ती ही पंचधातुची आहे. 

देवीच्या जवळच श्री नारायण देवाची सुरेख पाषाण मुर्ती आहे. 

प्रत्येक वर्षी श्री राम नवमीस कोलवेहून आणलेल्या मूर्तीचा उत्सव साजरा केला जातो

आणि उंच अशा रंगीबेरंगी सुंदर पुष्पांनी नयनरम्य नक्शीने सजवलेल्या रथातून श्रींची मिरवणूक निघते. 

श्रीरामनवमीस होणारा हा उत्सव फार वैशिष्ठ्यपुर्ण मानला जातो. 

रामनवमीस संध्यासमयी हा रथ थोडावेळ ओढून तेथेच थांबवला जातो. 

व नंतर दुस-या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध दशमीला पंचधातुच्या मुर्तीसमवेत मुळची बांदिवड्याची शालीग्राम मुर्ती या रथात विराजमान होते. 

महारथाची भव्य मिरवणूक निघते

अतिशय उत्साहात श्रद्धेने श्री देवीचे कुळावी, महाजन व अनेक भक्त असंख्य संखेने या महोत्सवात सहभागी होतात .

अनेक उत्तम सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम याठिकाणी प्रस्तुत होतात. 

मुळ शालीग्राम मुर्तीचा उत्सव दरवर्षी महशिवरात्रीस साजरा केला जातो. 

हया उत्सवात म्हणजे माघ वद्य चतुर्दशीला शिबिकोत्सव होतो. 

सुंदर सजविलेल्या स्वर्ण शिबिकेत श्री देवी विराजमान असतात. 

हा शिबिकोत्सव झाला की लगेच श्री देवींची उत्सव मुर्ती खांद्यावरील रथात बसविली जाते. 

हा खांद्यावरील रथोत्सव फार सुंदर असतो रथाची सजावट चित्ताकर्षक असते.

हा नयनरम्य सोहळा पाहणे म्हणजे भाग्याचेच समजावे. 

या वेळीही विवीध धार्मिक विधि, सोहळे केले जातात हे झाले म्हणजे रथोत्सवाची सांगता होते.  

व महाशिवरात्रीच्या दूसरे दिवशी म्हणजे माघ वद्य अमावस्येला श्री महालक्ष्मी देवीचे संपूर्ण मंदिर बंद असते. 

नंतर फाल्गुन प्रतिपदेला मंदिर उघडले जाते.

श्री महालक्ष्मी देवालयात श्री नारायण देव, श्री रवळनाथ, श्री नारायण पुरूष, श्री बाळेश्वर तसेच नि:सिम भक्त श्री सट्टो, फट्टो असा परिवार आहे. 


पोर्तुगीज काळात गोमंतकातील  जनतेवर अनन्वित अत्याचार झाले. 

जुलमाने हिंदुंचे ख्रिस्तीकरण करणे,  हिंदु देवदेवतांची, मंदिरांची तोडफोेड करणे, मंदिराचे चर्चमधे रूपांतर करणे, हिंदुना बाटवणे या सारख्या अत्याचाराने गोमंतकीय अगदी गांजून गेले होते.  

परंतु  यावर मोठ्या धैर्याने मात करून महाजनांनी, कुळाव्यांनी तसेच स्थानिकांनी आप आपली कुलदैवते तसेच पालवी दैवते जिवापाड सांभाळली.

|| महालक्ष्मीश्च विद्महे विष्णु पत्नीश्च धिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा