शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

Goa / सारस्वत ब्राम्हण ही पंचगौड ब्राह्मणांतील वस्ती गोमंतकात झाली


सारस्वत ब्राम्हण ही पंचगौड ब्राह्मणांतील एक उपजात. 

या जातीची मूळ वस्ती गोमंतकात झाली. 

इ.स.च्या १४व्या शतकात मुसलमानांनी गोव्यावर कबजा केला, 

तेव्हा त्यांनी हिंदूंना बाटवून मुसलमान करण्याचा प्रयत्न केला. 

त्यांनी हिंदूंची देवालये नष्ट भ्रष्ट केली आणि हिंदूंचा परोपरीने छळही केला.

या धार्मिक गंडांतरातून स्वधर्माचे रक्षण व्हावे म्हणून अनेक गोमंतकीय सारस्वत घराणी कोचीनला जाऊन स्थायिक झाली.


इ.स.च्या सोळाव्या ते अठराव्या शतकांत पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणात हिंदूंचा छळ करून धर्मांतर घडवून आणले. 

त्याही वेळी सारस्वत व इतर जाती यांनी गोवा सोडला. 

गोव्यात तिसवाडी, साष्टी व बारदेस या तीन तालुक्यातच प्रथम सारस्वतांची वसाहत होती. 

ते उत्तर व दक्षिण कानडा, कोचीन संस्थान, उत्तरेकडे रत्नागिरी जिल्हा व पूर्वेकडे बेळगाव, हुबळी, धारवाड वगैरे ठिकाणीही गेले. 

पुढे मराठेशाहीत, पेशवाईत व आंग्रशाहीत नशीब काढण्यासाठी अनेक सारस्वत घराणी पुणे, मुंबई, बडोदे, इंदूर, 

ग्वाल्हेर वगैरे ठिकाणी जाऊन स्थायिक झाली. गोव्याशिवाय मुंबई व कोचीन या ठिकाणी त्यांची वस्ती केंद्रित 

झाली असून, वर सांगितलेल्या सर्व ठिकाणी ती विखुरलेली आहे.


सारस्वत ब्राह्मण हे उत्तरेतून गोव्याला आले व परशुरामाने त्यांना गोव्यात आणले अशी परंपरागत समजूत आहे. 

याचा ऐतिहासिक अर्थ एवढाच आहे, की परशुरामाने अनार्यव्याप्त पश्चिम किनाऱ्यावर आर्यांच्या वसाहती स्थापन केल्या. 

त्या करताना त्याने आर्यावर्तातून ब्राह्मणादि आर्यकुलांना कोकण, मलबार व केरळ या भागांत नेले. 

ज्या काळात ही ब्राह्मणकुळे त्याने कोकणात नेली त्या काळात जातिव्यवस्था निर्माण झाली नव्हती. 

अर्थात गुर्जर, चित्पावन, हबिग, तुळुब, करहाटक, पूतिरी अशा ब्राह्मणजाती निर्माण झाल्या नव्हत्या.


सर्व ब्राह्मणांची पंचगौड व पंचद्रविड अशी विभागणीही झाली नव्हती. 

म्हणजे गोव्यात जी ब्राह्मणकुळे परशुरामाने आणली ती केवळ सारस्वत ब्राह्मणांची होती, असे म्हणता येत नाही. 

ती ब्राह्मणकुळी होती एवढेच म्हणता येईल.

आणि तरीही परशुरामाने दहा गोत्रांचे सारस्वत ब्राह्मण यज्ञकार्यार्थ गोव्यात आणले व त्यांना तिथे वसविले, अशा सह्याद्रिखंडाचा आधार देऊन सांगितले जाते. 

सह्याद्रिखंडातील यासंबंधीचा श्लोक आहे. 




गुरुवार, २३ जुलै, २०२०

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 23

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 23

श्री महाराजांनी आपल्या आईस काशीयात्रा घडविली वआईच्या हातून पुष्कळ दानधर्म कसा करविला दुस-यांची फजीती करणा-या शास्त्री बुवांच्या शंकाचे निरसन कसे केले हे कथन केले आहे.





Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 22

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 22



आजच्या भागात श्री महाराजांनी आबासाहेबांना त्यांच्या अंतकाळी श्री महाराजांचे दर्शन व्हावे ही त्यांची इच्छा पूर्ण केली त्यांच्या मुलीचे विठाबाईचे लग्न थाटामाटात पार पाडले. विप्रसभेत रामनामाचे श्रेष्ठत्व समजावून सांगीतले. तसेच काशीच्या आत्मानंद स्वामींना त्यांच्या शंकांचे निरसन करून रामनामाची दिक्षा दिली व त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार दिला हा वृत्तांत आला आहे.

निर्मिती : श्री शांतादुर्गा फाउंडेशन संकल्पना : श्री लक्ष्मीकांत शां. सुखटणकर.
कथानिवेदन : सौ. ज्योति लक्ष्मीकांत सुखटणकर
ध्वनि संकलक : केतकी ल. सुखटणकर
व्हिडीओ : रिषभ विश्वकर्मा.
या व्हिडीओचे सर्व हक्क श्री शांतादुर्गा फाउंडेशन कडे सुरक्षित आहेत.



Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 21

Shri Brahmachaitanya Gondavlekar Maharaj Charitra Part - 21

या भागात,श्री महाराजांनी गरीबा घरी त्यांच्या सह शे सव्वाशे माणसे जेवली .खरा पंत,दानशूर कसा असतो तसेच प्रापंचिक माणसाने घरांत असलेले सर्वच्या सर्व देवून टाकू नये ही गोष्ट खरी परंतु प्रसंग आला असता सर्व देण्याची तयारी पाहीजे हे श्री महाराजांनी सांगितले आले आहे.



Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 20

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 20



श्री महाराजांनी वाईट मार्गाला लागलेल्याला सन्मार्गाला कसे लावले. मुकी जनावरे देखील महाराजांवर निरतिशय प्रेम करीत. लांबवर असलेल्या आपल्या भक्तांवर महाराज कशी कृपा करत हे सारे वर्णन आले आहे.

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 19

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 19



आजच्या भागात श्री महाराजांनी परपिडा देखील सहन केली. श्री महाराज त्यांच्या अनेक भक्तांना कशी ओळख देत. श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अतिशय सुंदर श्रीराम मंदिर गोंदवले येथे भक्तांसाठी बांधले याचे वर्णन केले आहे.

निर्मिती : श्री शांतादुर्गा फाउंडेशन संकल्पना : श्री लक्ष्मीकांत शां. सुखटणकर.
कथानिवेदन : सौ. ज्योति लक्ष्मीकांत सुखटणकर
ध्वनि संकलक : केतकी ल. सुखटणकर
व्हिडीओ : रिषभ विश्वकर्मा.


Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 18

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 18

या भागात इंदुरचे अधिपती तुकोजीराव होळकर यांना अध्यात्मपर मार्गदर्शन केले त्यांना नामस्मरण करायला सांगीतले.जिजीबाई व भैयासाहेबांना श्री तुकामाईंची भेट घडवून गोंदवल्यास आले.



Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 17

Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Charitra Part - 17

आजच्या भागात सर्प बंधन करणा-या मांत्रिकांना श्री महाराज कशी क्षमा करतात. रावसाहेब नावाचे गृहस्थ महाराजांची कशी परीक्षा घेतात, इंदुरमधील वास्तव्यात पूर्वी भेटलेल़्या गवळ्याची ब-याच वर्षानी भेटल्यावर त्याची इच्छा कशी पूर्ण करतात हे सारे कथन केले आहे.